scorecardresearch

नालासोपारा पश्चिमेला अग्नितांडव; पाच ते सहा दुकाने जळाली, ३० पेक्षा अधिक दुचाकी पेटल्या  

या आगीत लाखो रुपायांचे नुकसान झाले आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील गॅलक्सी हॉटेल शेजारील दुकानांना लागलेल्या आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींचेही मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास येथील एका गादीच्या दुकानाला आग लागली. या दुकानात असलेला कापूस व कपड्यामुळे ही आग वाढत गेली व आजूबाजूला असलेली आठ ते दहा दुकानेही या घटनेत जळाली. या दुकानाच्या मागे असलेल्या पार्किंगमध्येही आग पसरल्याने  ३० ते ३५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यावेळी वेळी नागरिकांनी प्रसंगावधन दाखवत पार्किंगमधल्या दुचाकी बाहेर काढल्या अन्यथा अनेक गाड्या या आगीत जळून खाक झाल्या असत्या.

या घटनेची माहिती  वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र या आगीत लाखो रुपायांचे नुकसान झाले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shops and more than 30 two wheelers caught fire in the western part of nalasopara msr

ताज्या बातम्या