प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासोबत पॉडकास्ट शूट केलं. कुणाल कामरानं ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुणालची ही इच्छा संजय राऊत यांनी पूर्ण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणाल कामराने या पॉडकास्ट शूटचा फोटो त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंतचे सर्वोत्तम पॉडकास्ट शूट असा संदेशही त्याने लिहिला आहे. कुणाल कामरा या फोटोमध्ये संजय राऊत यांना खेळण्यातील जेसीबीचा सेट भेट करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. जेसीबी लावून हे बांधकाम पाडण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने राऊतांना जेसीबी भेट दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यातील टि्वटरवरील शाब्दीक द्वंद चांगलेच गाजले होते. कुणालने या कार्यक्रमात संजय राऊत यांना या वादाबद्दल काय विचारले असेल? याचीही उत्सुक्ता आहे.

शिवसेनेचे नेते, मुख्य प्रवक्ते, सामनाचे कार्यकारी संपादक, राज्यसभेतील खासदार अशा वेगवेगळ्या भूमिकेत वावरणारे संजय राऊत सातत्यानं राज्याच्या राजकारणातील चर्चेच्या वर्तुळात असतात.

“संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही,’ असं कुणाल कामरा म्हणाला होता. कुणाल कामरानं दिलेलं मुलाखतीचं निमंत्रण संजय राऊत यांनी स्वीकारलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shut up kunal podcast shoot with sanjay raut dmp
First published on: 11-10-2020 at 21:30 IST