scorecardresearch

Premium

मुलुंडमध्ये पदपथ खचल्याने सहा दुचाकींचे नुकसान

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पदपथ खचल्याची घटना शुक्रवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही.

pavement-collapsed-in-Mulund
पदपथावर उभ्या दुचाकींचे नुकसान झाले. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पदपथ खचल्याची घटना शुक्रवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र पदपथावर उभ्या असलेल्या सहा दुचाकी खड्यात पडल्या आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Terror of serial rapist in Vasai city
वसई : शहरात पुन्हा एकदा ‘सिरियल रेपिस्टची’ दहशत, मोकाट विकृताचा आणखी एका चिमुकलीवर बलात्कार
Worker died electric shock Boisar
बोईसरमध्ये वीजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू, दुसरा कामगार गंभीर जखमी
KEM Hospital
लग्नानंतर आठ वर्षांनी गरोदर राहिलेल्या महिलेला पक्षाघाताचा झटका; केईएमच्या डॉक्टरांनी अशी केली गुंतागुंतीची प्रसूती

मुलुंडच्या पी.के.रोड परिसरात शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. या परिसरातील पदपथाच्या दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी रात्री अचानक हा पदपथ चार ते पाच फूट खचला. रात्रीच्या वेळी या पदपथावरून कोणीही ये-जा करत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र पदपथावर उभ्या दुचाकींचे नुकसान झाले.

आणखी वाचा-कुर्ल्यात एसआरए इमारतीला भीषण आग, ३९जण घुसमटले

स्थानिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रस्ता रोधक उभे करून दुर्घटनाग्रस्त पदपथावर प्रवेश मनाई केली. दरम्यान, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Six bikes damaged in mulund after the pavement collapsed mumbai print news mrj

First published on: 16-09-2023 at 12:07 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×