ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील उन्नत मार्गाच्या कामासाठी मुंब्रा शिळफाटा दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक ४ ओलांडण्यासाठी ६३ मीटर लांबीचे स्टीलचे ८ गर्डर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ आणि २५ डिसेंबरला विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीत या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद असेल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान अवजड वाहतूक इतर मार्गाने वळवली जाणार आहे. तसेचमुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून इतर वाहतूक उड्डाणपूलाखालून सुरू राहील असेही एमएमआरडीएने सांगितले आहे.

हेही वाचा >>>“…तर आपणही यांच्यासारखं मंत्री बनून शाब्दीक भीक मागत असतो”, उद्धव ठाकरेंनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, नवी मुंबई आणि डोंबिवली अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने १२.३० किमीच्या ऐरोली ते कटाई नाका उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. ऐरोली ते डोंबिवलीमधील अंतर थेट १० किमीने कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे. ऐरोली ते कटाई प्रकल्प पूर्ण झाल्यास नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत करता येणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील उन्नत मार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. भारत बिजलीजवळील भागात उन्नत मार्गाची उंची साधारणतः जमिनीपासून १५ मीटर इतकी आहे. त्यानुसार या उंच मार्गासाठी आठ गर्डर बसविण्यात येणार असून या गर्डरचे वजन अंदाजे ६५० मेट्रिक टन असेल. दोन टप्प्यात गर्डर टाकण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात चार आणि दुसऱ्या टप्प्यात चार असे गर्डर बसवण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>>अन्न व औषध प्रशासनाला तेलभेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात अडसर!

या गर्डर उभारणीसाठी ए-७५० टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेन वापरण्यात येणार असून डायाफ्राम जोडणीसाठी २ अतिरिक्त क्रेन वापरल्या जाणार आहेत. या आठ गर्डरच्या आव्हानात्मक कामासाठी विशेष ट्राफिक ब्लॉकची अर्थात वाहतूक बंद ठेवण्याची गरज आहे. त्यानुसार एमएमआरडीएने वाहतूक पोलिसांकडे विशेष ट्राफिक ब्लॉकसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार ही परवानगी मिळाली असून १८ (सोमवारी) आणि २५ डिसेंबरला (रविवारी) विशेष ट्राफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. १८ डिसेंबरला रात्री १२.०१ वाजल्यापासून रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाहतूक बंद रहाणार आहे. तर २५ डिसेंबरला १२.०१ वाजल्यापासून रात्री ११.५९ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक असणार आहे. कामादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महामार्ग क्र. ४ वर मुंब्रा शिळफाटा दरम्यानची अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ही वाहतूक इतर पर्यायी मार्गांनी वळविली जाणार आहे. तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून इतर वाहतूक उड्डाणपूलाखालून सुरू रहाणार आहे.