अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव तब्बल ७२ ते ७३  तासांनी मुंबईतील ग्रीन एकर्स या निवासस्थानी दाखल झाले. रात्री ९.३० च्या सुमारास दुबईतून चार्टर्ड विमानाने हे मुंबई विमानतळावर आणण्यात आले. तर रात्री १०.४५ च्या सुमारास श्रीदेवी यांचे पार्थिव ग्रीन एकर्समध्ये पोहोचले. बोनी कपूर यांची भेट घेण्यासाठी सेलिब्रेटी ग्रीन एकर्स या ठिकाणी पोहचत आहेत. अभिनेता सलमान खानसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार बोनी कपूर यांची भेट घेण्यासाठी ग्रीन एकर्स या ठिकाणी आले होते.

मुंबई विमानतळावर चाहत्यांची आणि मीडियाची गर्दी झाली होती. त्यामुळे विमानतळावरून हे पार्थिव कोकिलाबेन रूग्णालयाच्या अँब्युलन्समधून गेट क्रमांक एक ऐवजी गेट क्रमांक ८ वरून बाहेर काढण्यात आले. अँब्युलन्समध्ये बोनी कपूर स्वतः श्रीदेवी यांच्या पार्थिवाशेजारी बसले होते. या अँब्युलन्सच्या पुढे उद्योजक अनिल अंबानी हेदेखील आपल्या कारने निघाले आणि ग्रीन एकर्स या निवासस्थानी पोहचले. बोनी कपूर यांचे भाऊ आणि अभिनेते अनिल कपूर विमानतळावर दाखल झाले होते. बोनी कपूर यांना पाहताच अनिल कपूर यांना रडू लागले. तसेच बोनी कपूर यांनाही रडू आले. अत्यंत भावनिक असा हा क्षण होता. अनिल कपूर यांच्यासोबत श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी आणि खुशी यादेखील आल्या होत्या.

अनिल कपूर आणि सपा नेते अमर सिंह यांनीही बोनी कपूर यांची भेट घेतली. तसेच त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अँब्युलन्सला वाट काढून देत शक्य तितक्या लवकर ही अँब्युलन्स श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे निवासस्थान असलेल्या ग्रीन एकर्स या ठिकाणी कसे पोहचेल याची चोख व्यवस्था पाहिली. श्रीदेवी यांच्या ग्रीन एकर्स या निवासस्थानी अनिल अंबानी, अभिनेते सतीश कौशिक, लेखक जावेद अख्तर, त्यांच्या पत्नी शबाना आझमी, फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा या सगळ्यांनी हजेरी लावली आहे. सिनेसृष्टीतील इतरही कलाकार या ठिकाणी बोनी कपूर यांचे सांत्वन करण्यासाठी रात्रीतून पोहचण्याची शक्यता आहे.

 

ग्रीन एकर्सच्या परिसरात श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. उद्या सकाळपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव ग्रीन एकर्स या ठिकाणीच असणार आहे अशीही माहिती मिळाली आहे.  उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी सेलिब्रेशन क्लब या ठिकाणी श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान त्यांची अंत्ययात्रा निघेल. दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

श्रीदेवी शनिवारी दुबई या ठिकाणी लग्नसोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत बोनी कपूर आणि मुलगी खुशीही होते. त्याच दिवशी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती.  दुबई पोलिसांनी सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर श्रीदेवी यांचे पार्थिव कपूर कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. सुरुवातीला कार्डिअॅक अरेस्टमुळे श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले होते. मात्र फॉरेन्सिक अहवालानुसार श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू  बाथटबमधील पाण्यात पडून झाल्याचे समोर आले.

 

लाइव्ह अपडेट्स

श्रीदेवी यांचे पार्थिव ग्रीन एकर्समध्ये पोहचले

फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राही निवासस्थानी दाखल

अभिनेते सतीश कौशिक ग्रीन एकर्समध्ये दाखल

इन्फिनिटी मॉलजवळ अँब्युलन्स पोहचली

श्रीदेवी यांचे पार्थिव लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट या ठिकाणी पोहचले

बोनी कपूर यांचे निकटवर्तीयही ग्रीन एकर्स या ठिकाणी दाखल झाले आहेत.

ग्रीन एकर्स या ठिकाणी जावेद अख्तर, शबाना आझमी दाखल

अनिल कपूर यांना अश्रू अनावर, जान्हवी आणि खुशी कपूर याही अनिल कपूर यांच्यासोबत घराच्या दिशेने रवाना

उद्योगपती अनिल अंबानीही विमानतळावर दाखल

अँब्युलन्समध्ये श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत बोनी कपूर आणि संजय कपूर

ग्रीन एकर्स परिसरात श्रीदेवी यांचे फॅन्स आणि जनसमुदाय दाखल

मीडिया आणि श्रीदेवी यांच्या फॅन्सची विमानतळावरही गर्दी

बोनी कपूर हे अँब्युलन्समध्ये श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत

स. पा. नेते अमरसिंहही मुंबई विमानतळावर दाखल

कार्गो टर्मिनलद्वारे अँब्युलन्समधून श्रीदेवी यांचे पार्थिव घरी नेले जाणार

एअरपोर्ट ते लोखंडवाला परिसरात पोलीस बंदोबस्त

 

हिंदू स्मशानभूमी विलेपार्ले सेवा समाज या ठिकाणी श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार

काही वेळातच श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबई विमानतळावरून लोखंडवाला येथील ग्रीन एकर्सला नेले जाणार

उद्या सकाळच्या वेळी श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी या मुंबई विमानतळावर पोहचल्या आहेत अशीही माहिती मिळाली आहे.

विशेष चार्टड विमानाने श्रीदेवी यांचे पार्थिव दुबई येथून मुंबईत आणण्यात आले आहे. हे विमान अंबानी यांनी दुबईत पाठवले होते अशी माहिती समजते आहे.

बोनी कपूर, अर्जुन कपूर आणि संजय कपूर हे तिघे दुबईतून श्रीदेवी यांचे पार्थिव घेऊन आल्याची माहिती समोर

मुंबई विमानतळावरची औपचारिकता पार पडल्यानंतर श्रीदेवी यांचे पार्थिव लोखंडवाला येथील ग्रीन एकर्स मध्ये पार्थिव नेले जाणार

श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईतील निवासस्थानी घेऊन गेल्यावरही सिनेसृष्टीतील कलावंत घरी हजेरी लावण्याची शक्यता

 

#Sridevi‘s mortal remains brought to Mumbai from Dubai, funeral to take place tomorrow pic.twitter.com/L9T5aB42LH