मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. सह्याद्री अतिथी गृहावर बुधवारी मुख्यमंत्री व नगरपलिका कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या वेळी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या दोन हजार रोजंदारी कर्मचाऱ्याां कायम करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित वेतन भागविण्यासाठी अनुदान देणे, अनुकंपा धर्तीवर नियुक्त्या, इत्यादी प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. या सर्व प्रश्नांवर योग्य ते निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी जाहीर केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State corporation employee takes back strike
First published on: 24-07-2014 at 04:52 IST