अनुकंपा धोरण जानेवारी २०२० पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने

सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तसा शासन आदेश काढला आहे.

करोना साथरोगाच्या पाश्र्वभूमीवर निर्णय

मुंबई : शासकीय सेवेत असताना अधिकाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीस अनुकंपा तत्वार नियुक्ती देण्याच्या धोरणाची १ जानेवारी २०२० पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. करोना साथरोगाच्या पाश्र्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक नेते ग.दि. कु लथे यांनी स्वागत के ले आहे. 

राज्य शासनाच्या सेवेतील फक्त गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकं पा धोरण लागू होते. शासनातील गट अ व ब संवर्गातील अधिकाऱ्यांनाही हे धोरण लागू करावे, अशी महासंघाची अनेक वर्षांची मागणी होती. अखेर २६ ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला.

देशात व राज्यात मागील मार्चपासून करोना साथरोगाने हाहाकार उडविला आहे. या साथरोगाचा मुकाबला करताना शासकीय सेवेतील अनेक कर्मचारी व अधिकारी करोनाची लागण झाल्यामुले दगावले आहेत. त्यामुळे दुखाचा आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागलेल्या मृत अधिकाऱ्यांच्या कु टंबांना दिलासा देण्यासाठी अधिकाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या अनुकं पा धोरणाची मागील वर्षांपासून अंमलबजावणी करावी, अशी मागणी महासंघाने के ली होती. राज्य सरकारने त्याची दखल घेऊन १ जानेवारी २०२० पासून हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तसा शासन आदेश काढला आहे. ही मागणी मान्य के ल्याबद्दल महासंघाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State government decided to implement compassionate policy from january 1 2020 zws