राज्याच्या आरोग्य विभागात डॉक्टरांची हजारो पदे भरण्यातच आली नसल्याने त्याचा फटका आरोग्य विभागाच्या सर्वच कार्यक्रमांना मोठय़ा प्रमाणात बसत असून गेल्या तीन वर्षांत पुरुष व स्त्री नसबंदीच्या आकडेवारीतही सातत्याने घट होत आहे. आरोग्य विभागाने निश्चत केलेल्या नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टाचा विचार करता अवघे तीन टक्के पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आरोग्य विभागाला ‘यश’ आल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरुष नसबंदी करणाऱ्या व्यक्तीला १३०० रुपये तर स्त्री नसबंदीसाठी ६०० रुपये देण्यात येतात. दारिद्रय़ रेषेखालील महिलांनी तसेच मागासवर्गीय महिलांनी खाजगी रुग्णालयांमध्ये नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास १३५० रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे ‘सावित्रीबाई फुले कन्या कल्याण’ योजनेअंतर्गत दारिद्रय़ रेषेखालील जोडपे ज्यांना मुलगा नाही व दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या व्यक्तीस दोन हजार रुपये व मुलींच्या नावे आठ हजार रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येते. तथापि सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेलाही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे १८४५, ११२७ आणि १२२१ लोकांनीच प्रतिसाद दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sterilization surgery health department
First published on: 13-08-2017 at 01:02 IST