मुंबई : भांडवली बाजारातील दलाल मनीष ठक्कर यांनी गुरुवारी रात्री मुलुंड येथील इमारतीच्या १५व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. भांडवली बाजारातील दलालीच्या व्यवसायातील तोटय़ामुळे मनीष गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्येच्या गर्तेत होते. त्यांच्यावर मनोविकारतज्ज्ञांचे उपचारही सुरू होते. रात्री १५व्या मजल्यावरील गच्ची त्यांनीच उघडली आणि काही क्षणात त्यांनी स्वत:ला खाली झोकून दिले. त्यांचे नैराश्य आणि उपचार याबाबत कुटुंबानेच पोलिसांना माहिती दिली. मुलुंडच्या बी. आर. मार्गावरील बहुमजली इमारतीत मनीष पत्नी, मुलासोबत वास्तव्यास होते. त्यांच्यावर फारसे कर्ज नव्हते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2019 रोजी प्रकाशित
शेअर दलालाची आत्महत्या
मुलुंडच्या बी. आर. मार्गावरील बहुमजली इमारतीत मनीष पत्नी, मुलासोबत वास्तव्यास होते
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-09-2019 at 00:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock broker suicide in mumbai zws