बोरीवली स्टेशनजवळच्या एका इडलीवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा इडली आणि मेदूवडा विकणारा चक्क बोरीवली येथील टॉयलेटमधलं पाणी चटणीसाठी वापरतो आहे. त्यासंदर्भात त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने हे टॉयलेट नाही असे म्हटले आहे. मात्र व्हिडिओमध्ये तो टॉयलेटमधलं पाणी कॅनमध्ये आणून भरतो आणि तेच पाणी वापरतो हे स्पष्ट दिसते आहे. अनेकजण सकाळच्यावेळी नाश्ता करण्यासाठी इडली आणि वडा हा पर्याय निवडतात. मुंबई आणि उपनगरांमध्ये असे शेकडो इडलीवाले आहेत. मात्र बोरीवली स्टेशनजवळच्या या इडलीवाल्याने लोकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. सोशल मीडियावर या इडलीवाल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. सुरज उपाध्याय नावाच्या एका फेसबुक युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहा व्हिडिओ

दरम्यान या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली आहे. आम्ही या सगळ्या प्रकाराची चौकशी करतो आहोत हा इडलीवाला चटणी तयार करण्यासाठी टॉयलेटमधलं पाणी वापरत असल्याचं समोर आलं आहे. रस्त्यावर ठेला लावणारा हा इडलीवाला आणखी काय करतो? त्याच्याप्रमाणेच आणखी कोण कोण ठेलेवाले हे पाणी वापरत आहेत याची चौकशी आम्ही सुरू केली आहे असं अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी शैलेश आढाव यांनी म्हटलं आहे.

मुंबईत स्वस्त आणि मस्त नाश्त्याचा पर्याय म्हणून इडली चटणी किंवा मेदूवडा चटणीकडे पाहिलं जातं. त्यामुळेच असे शेकडो इडली आणि वडेवाले मुंबईत ठेला लावून त्यांचा व्यवसाय करतात. त्यांना लोकांकडून प्रतिसादही चांगला मिळतो. वडापावच्या खालोखाल किंवा त्याच बरोबरीने इडली आणि मेदुवडा यांना मागणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र मुंबईतल्या बोरीवली या ठिकाणी इडली विकणारा हा इडलीवाला मात्र लोकांच्या आरोग्याशी खेळ करतो आहे हे समोर आलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street food vendor using tap water from a toilet at borivali railway station to make chatni for idli video viral on social media
First published on: 01-06-2019 at 08:55 IST