scorecardresearch

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

स्थळ चर्चगेट रेल्वे स्थानक… वेळ दुपारी १२ ची… स्थानकात विसावणाऱ्या लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांची इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू होती.

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार
चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

स्थळ चर्चगेट रेल्वे स्थानक… वेळ दुपारी १२ ची… स्थानकात विसावणाऱ्या लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांची इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू होती. त्याच वेळी अचानक स्थानकात संगीताचे सूर कानी पडू लागले. गर्दीमधील विद्यार्थ्यांनी संगीतावर ठेका धरला आणि क्षणभरातच चर्चगेट स्थानकातील वातावरण बदलून गेले. स्थानकातून बाहेर पडण्याच्या बेतात असलेल्या प्रवाशांचे पाय तेथेच थबकले आणि त्यांनीही संगीतावर ठेका धरला.
एच. आ. महाविद्यालयातील ‘रोटारैक्ट क्लब’तर्फे भारताच्या सस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाचे गुरुवारी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा >>> “…तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो”; शिवसेना नेते अंबादास दानवेंचा इशारा

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या बाहेर एच.आर महाविद्यालयाच्या २५० विद्यार्थ्यांच्या फ्लॅश मॉबने महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दक्षिण भारतातील संस्कृतीचे दर्शन नृत्याच्या माध्यमातून घडविले. प्रत्येक राज्यांची संस्कृती नृत्याच्या माध्यमातून सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित प्रवाशांनी दाद दिली. इतकेच नव्हे तर काही प्रवाशांनी संगीतावर ठेकाही धरला. काही प्रवासी हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपण्यात दंग होते.करोनाकाळानंतर फ्लॅश मॉबच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी पुन्हा एकदा विद्यार्थी सज्ज झाले आहेत. चर्चगेट स्थानकातील कार्यक्रम आटोपून विद्यार्थी मुंबई सेंट्रलच्या दिशेने रवाना झाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students perform dance at churchgate railway station mumbai print news amy

ताज्या बातम्या