शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर बोचऱ्या शब्दांत टीका करणाऱ्या ‘लोकसत्ता’मधील ‘नालायकांचे सोबती’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
सत्तेत भारतीय जनता पक्षासोबत भागीदारी करतानाच सरकारवरील टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. मात्र, ज्या सरकारला ते आपल्या भाषणांमधून नालायक ठरवितात त्याच सरकारमध्ये आपलेही मावळे आहेत, हे ते विसरतात. ११ एप्रिलला प्रकाशित झालेल्या या अग्रलेखात नेमक्या या विरोधाभासावर बोट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या अग्रलेखावर आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरुवापर्यंत आपले मत नोंदविता येईल. indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students reaction on loksatta editorial
First published on: 20-04-2016 at 05:35 IST