म्हाडा प्राधिकरणाच्या ५६५ रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून कागदपत्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेदरम्यान कागदपत्रे जमा करू न शकलेल्या उमेदवारांना म्हाडाने एक संधी दिली आहे. त्यानुसार अशा उमेदवारांना २१ जूनपर्यंत कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

उमेदवारांना शेवटची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हाडा सरळ सेवा -२०२१ अंतर्गत यशस्वी उमेदवारांना टप्प्याटप्प्याने कागदपत्रे सादर करण्यासाठी बोलविण्यात आले होते. ६ आणि ७जून, ९ आणि १० जून, १४ आणि १५ जून तसेच १६ आणि १७ जूनला कागदपत्रे जमा करून घेण्यात आली आहेत. मात्र या दरम्यान काही उमेदवार कागदपत्रे जमा करू शकले नाहीत. अशा उमेदवारांना शेवटची एक संधी देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना २१ जूनला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत म्हाडा भवनात कागदपत्रे जमा करता येणार आहेत. या मुदतीत कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना भरतीत स्वारस्य नाही, असे समजून त्यांच्या नावाचा विचार करण्यात येणार नाही, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.