एका जीवाला जन्म देण्याची ताकद ही केवळ स्त्रीमध्येच आहे. बाळाच्या जन्मानंतर त्या नवजात बाळाला फक्त आईचाच स्पर्ष कळत असतो. त्यामुळे प्रसुतीनंतर बाळाला आईकडे दिले जाते. सध्याच्या धकाधुकीच्या युगात गरोदरपणातले अनेक समस्याही वाढल्या आहेत. पण एक अशी महिला आहे जिने मुलांना जन्म देताच कोमात गेली. मुलांना साधा आईला स्पर्षही करता आला नाही. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मुंबईतील या महिलेला जुळ्या मुलांची चाहुल लागली. त्यानंतर तिची प्रसूती ही सिझरिंग पद्धतीने झाली. सिझरिंग झाल्यानंतर काही वेळात ही महिला कोमामध्ये गेली.

जगात आल्यावर या जुळ्या बाळांना आपल्या आईचा स्पर्शदेखील अनुभवता आला नाही. मुंबईतील एका रूग्णालयात या महिलेची प्रसूती झाली आणि ती काही वेळात कोमामध्ये गेली. कोमात गेलेल्या या महिलेला डॉक्टरांनी जसलोक रूग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. जसलोकमध्ये काही टेस्टनंतर तिच्या मेंदूमध्ये इजा असल्याचे निदर्शनास आले. जसलोक रूग्णालयातील न्युरोसर्जरी विभागाचे संचालक डॉ. परेश दोषी यांच्या अधिपत्याखाली तसेच जपान येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या महिलेवर डीबीएस अर्थात डिप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ग्लोबल हायपोक्सिक अशी मेंदूची दुखापत या महिलेला झाल्याने डीबीएस करण्याचा निर्णय डॉ. दोषी आणि टीमने घेतला. जानेवारीमध्ये या महिलेची प्रसूती झाल्यानंतर ती कोमामध्ये होती. मात्र २ महिने तिच्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत अनेक रूग्णांवर डीबीएस सर्जरी करण्यात आली आहे. मात्र कोमामध्ये असलेल्या रूग्णावर डीबीएस सर्जरी करणे हे कदाचित पहिल्यांदाच झाले आहे. याबद्दल सांगताना दोषी म्हणाले की, ‘ही शस्त्रक्रिया मी व माझ्या टीमसाठी एक आव्हान होते, कारण या महिलेवर तिच्या २ बाळांची जबाबदारी आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जसलोकचे सिईओ डॉ. तरंग गिअनचंदानी म्हणाले की, ‘महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तिच्यात अनेक सकारात्मक सुधारणा दिसत आहेत. लवकरच हे संपूर्ण कुटुंब त्यांचं पुढील आयुष्य आनंदात घालवू शकतील याबद्दल आम्ही आशावादी आहोत. आमची संपूर्ण टीम त्या नवजात बालकांना त्यांची आई सुखरूप देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.’