पॉर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये एण्ट्री घेतलेल्या अभिनेत्री सनी लिओनी हिने बुधवारी ठाणे आयुक्तांच्या कार्यालयात हजेरी लावली. डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे सनी लिओनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासंदर्भात सनीने आपल्या वकीलांसह ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सनीने तिच्या संकेतस्थळावर स्वत:ची अश्लील छायाचित्रे टाकली असल्याने लहान मुले तसेच तरुण वर्गामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत रणरागिणी शाखेने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
सनी लिओनीचे संकेतस्थळ केवळ प्रौढांनी पाहावे, असे म्हटले असले तरी ते सर्व स्तरांतून पाहिले जात आहे. भारतीय युवा पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न सनी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.