शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना ‘निलू बाळा’ म्हणत सडकून टीका केली आहे. निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना बारामतीचा खासदार बदलावा लागेल, अशी टीका केली होती. त्यावर सुषमा अंधारेंनी ट्वीट करत राणेंना प्रत्युत्तर दिलं.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून, हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात भाजपा अन् राज्यात ईडी सरकार आले. तरीही शिवसेनाभवनच्या समोर हिंदुत्वासाठी आक्रोशमोर्चा काढावा लागत असेल, तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे. त्यामुळे ते बदलावेच लागेल नाही का?”

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

निलेश राणे काय म्हणाले होते?

निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार असल्याच्या इशाऱ्यावर टीका करत म्हटलं, “या ठिकाणी ६ पैकी २ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री राहिले आहेत. शरद पवार स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. एवढं असून जर आंदोलन करावं लागतं, तर बारामतीचे खासदारच बदलावे लागतील.”

हेही वाचा : VIDEO: संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ वक्तव्याला पाठिंबा की विरोध? सुषमा अंधारे स्पष्टच म्हणाल्या,”चोर के दाढी में…”

निलेश राणेंच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर

निलेश राणेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस अदिती नलवडे यांनी निलेश राणेंच्या ट्वीटवर एक व्हिडीओ पोस्ट करत टीका केली.

हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी निलेश राणेंना ‘ज्युनियर थापा’ असं म्हटलं. तसेच व्हिडीओत सुप्रिया सुळेंचं काम निलेश राणेंच्या तुलनेत कसं प्रभावी आहे, हे सांगितलं.