शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून केलेल्या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना एका गोष्टीच्या रुपातून उत्तर दिलं. त्यांनी दोन शहाण्या वाघांची गोष्ट सांगितली. तसेच दोन शहाण्या वाघांच्या भांडणात कुत्र्यांचा फायदा होऊ द्यायचा नाही हे कळायला शहाणा वाघ असावा लागतो,” असं म्हटलं. त्या गुरुवारी (१ नोव्हेंबर) मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “अ आणि ब असे दोन वाघं होते, शहाणे वाघ होते. यातला शहाणा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. दोन्ही वाघांची प्रचंड दोस्ती होती. एकत्र खायचे-प्यायचे, खेळायचे, उठायचे-बसायचे. कालांतराने दोघांमध्ये भांडण झालं आणि वितुष्ट आलं. भांडणानंतर ब वाघाने आपल्या लेकराला सांगायला सुरुवात केली की, अ वाघाने असं केल, तसं केलं, अ वाघ असा वाईट आहे.”

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

“एकेदिवशी हा ब वाघ आपल्या लेकराला शिकार शिकवायला घेऊन गेला. ब वाघ त्याच्या लेकराला शिकार शिकवायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याचं लेकरू म्हणालं की, बाबा बाबा ते बघा अ वाघ. ब वाघाने विचारलं, कुठे आहे? लेकरू म्हणालं, रस्त्यावर आहे. ब वाघाला आनंद झाला. म्हटला, बघ आता कसा आजारी पडला आहे,” असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “तितक्यात एक कुत्र्यांचा मोठा घोळगा आला. ते बघून ब वाघाचं लेकरू आनंदाने म्हणालं की, बाबा आता बघा अ आजारी आहे आणि कुत्र्यांचा घोळगा येतोय. हे कळल्यानंतर ब वाघाने काहीही पाहिलं नाही आणि जोराची झेप घेत त्या कुत्र्यांच्या घोळक्यावर तुटून पडला आणि त्या कुत्र्यांना पाय लावून पळायला लावलं.”

हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

“हे बघून ब वाघाचा छोटा पोरगा म्हणाला की, बाबा तुम्ही अ वाघाचा एवढा राग करता, आज चांगली संधी आली होती, तुम्ही का मदतीला गेलात? ब शहाणा वाघ होता. तो मिमिक्री आर्टिस्ट नव्हता. तो म्हणाला, ‘काहीही झालं तरी हे भांडण दोन वाघांमध्ये आहे, त्यात कुत्र्यांचा फायदा व्हायला नको’. हे कळायला शहाणपण लागतं,” असं म्हणत अंधारेंनी राज ठाकरेंना टोला लगावला.