‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये आज उपस्थिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरेदीबरोबरच बक्षिसे मिळण्याची संधी आणि प्रसिद्ध कलाकारांशी भेट असा दुहेरी आनंद मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या पाचव्या पर्वात अभिनेता स्वप्निल जोशी सहभागी होणार आहे. सोमवारी (२१ जानेवारी) सायंकाळी माटुंग्याच्या अरोरा टॉवरजवळील ‘रंगोली’ आणि दादर येथील अंग्रेजी ढाबा या ठिकाणी स्वप्निल भेट देणार आहे.

वयाच्या नवव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या स्वप्निलने हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्याचा ‘मी पण सचिन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून श्रेयश जाधव लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात तो एका क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, गिफ्ट कूपन, एसी, ओव्हन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येणार असून महोत्सवाच्या अखेरीस पहिल्या भाग्यवान विजेत्याला ‘केसरी टुर्स’कडून सहलीचे पॅकेज दिले जाणार आहे. हा महोत्सव १६ जानेवारीपासून सुरू झाला असून २७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. बृहन्मुंबई परिसरातील अनेक शोरूम्स यात सहभागी झाल्या आहेत.

‘रिजन्सी’ समूह प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘वास्तुरविराज’ आणि ‘पितांबरी’ पावर्ड बाय पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे या फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर आहेत. ‘एम.व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि.’, ‘नम्रता ज्वेलर्स’, ‘मे. पांडुरंग हरी वैद्य अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स’, ‘उज्ज्वल तारा’ हे सिल्व्हर पार्टनर, तर ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत. फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेज पार्टनर ‘अंग्रेजी ढाबा’, ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स’, एंटरटेन्मेंट पार्टनर ‘एनडीज फिल्म वर्ल्ड’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘लँडमार्क मर्सिडीज’ आहेत.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक दुकानदारांनी नमिता खांडभोर (८१०८३८८१२२), निक्षित राठोड (९८२०५५१२५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे स्वरूप

  • लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेची, तसेच दागिन्यांच्या दुकानांमधून ३००० रुपयांहून अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एका देयकावर एक कूपन दिले जाईल.
  • ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेले कूपन स्वीकारले जाणार नाही.
  • ड्रॉप बॉक्समध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध केली जाणार असून अटी-नियम लागू आहेत.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi in loksatta mumbai shopping festival
First published on: 21-01-2019 at 01:08 IST