गणित चुकल्याने शिक्षकाने रोहन दत्तात्रय जंजीरे या 8 वर्ष वयाच्या छोटया विद्यार्थ्याच्या तोंडामध्ये लाकडी छडी घातली. त्यामुळे रोहनच्या अन्ननलिका व श्वसननलिकेस गंभीर इजा झाली आहे. जखमी रोहन या विद्यार्थ्यास पुणे येथिल रूबी हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याचे वडील दत्तात्रय जंजीरे यांनी पालकमंत्री राम शिंदे व सरकारने तातडीने तज्ञ डॉक्टारांचे पथक रूग्णालयात पाठवावे अशी मागणी केली आहे. संबंधीत शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंजीरे कर्जत तालुक्यात पिंपळवाडी येथे राहतात.

या बाबत रोहनची आई सुनिता दत्तात्रय जंजीरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हणटले आहे कि,  जिल्हापपरिषद प्राथमिक शाळा  पिंपळवाडी येथे माझा मुलगा रोहन हा इयत्ता 2 री मध्ये शिकत आहे. शाळेचे काम सुरू असताना वर्गामध्ये रोहनचे गणित सोडवताना चुक झाली त्याचा राग चंद्रकात सोपान शिंदे या शिक्षकाला आला व तुला काहीच येत कसे नाही असे म्हणून  त्यानी रागाने त्यांच्या हातामध्ये असलेली लाकडी छडी  रोहनच्या तोडांमध्ये कोबंली अचानक लाकडी छडी तोंडात घुसवल्याने रोहन जोरात ओरडला. त्याच्या अन्ननलिका व श्वासननलिकेला इजा झाली आहे.

तोंडात इजा झाल्याने रोहन यास बोलता येईना यामुळे सर्वाची धावपळ उडली त्याला प्रथम राशिन येथे खाजगी रूग्णालयामध्ये नेले नंतर बारामती येथे नेण्यात आले मात्र तिथे असणा-या डॉक्टरानी रोहन याची जखम गंभीर असल्याने त्यास पुणे येथे रूबी हॉस्पीटल येथे नेण्यास सांगितले. यांनतर रोहन याचेवर आतिदक्षता विभागामध्ये ठेवून तेथिल डॉक्टर  उपाचार करीत आहेत.
या घटनेनंतर तालुका गटशिक्षण आधिकारी श्री शिंदे यांनी पिंपळवाडी शाळेला भेट देवून सर्व माहिती व विद्यार्थी व इतर शिक्षक यांचे जबाब घेतले आहेत. तर पोलीसांनी चंद्रकात सोपान शिंदे या शिक्षकावर कलम 234 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे