मुंबईतील जीटीबी नगर जवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे जाणाऱया रेल्वे वाहतूक ठप्प झाली. जीटीबीनगर जवळ पाँईट फेल्युअर झाल्यामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे गेल्या अर्ध्यातासापासून हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे थंडावली आहे. दोन दिवसांपूर्वीच दादर रेल्वे स्थानकावर अचानक लागलेल्या आगीमुळे वाहतूक ठप्प झाली होती. सतत होणाऱया या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical failure in harbour railway
First published on: 05-04-2014 at 05:09 IST