चार वर्षांच्या एका बालिकेवर बलात्कार करणाऱ्या राजेश वामणे या डोंबिवलीतील रिक्षाचालकाला न्यायालयाने १९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. दरम्यान, कल्याण न्यायालयातील फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ करंगुळे, सहसचिव अॅड. गणेश पाटील व त्यांच्या सर्व सदस्यांनी वामणे याचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करणाऱ्या वामणे याने एका चार वर्षांच्या मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली होती.
बामणे नव्हे ‘वामणे’
रिक्षाचालकाने चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या ‘लोकसत्ता’तील मंगळवारच्या वृत्तात आरोपीचे नाव नजरचुकीने राजेश बामणे असे प्रसिद्ध झाले. ते राजेश वामणे असे आहे. राजेश बामणे हे उल्हासनगरमधील नेताजी येथे राहतात. ते शिक्षणविषयक कामे करतात.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘त्या रिक्षाचालकास पोलीस कोठडी
चार वर्षांच्या एका बालिकेवर बलात्कार करणाऱ्या राजेश वामणे या डोंबिवलीतील रिक्षाचालकाला न्यायालयाने १९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. दरम्यान, कल्याण न्यायालयातील फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ करंगुळे, सहसचिव अॅड. गणेश पाटील व त्यांच्या सर्व सदस्यांनी वामणे याचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 13-12-2012 at 03:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: That riksha driver in police custody