मॅजेस्टिक बुक डेपो, मॅजेस्टिक बुक हाऊस, शब्द द बुक गॅलरी यांच्यातर्फे ‘दिवाळी अंक भेट’ योजना उपक्रमास सुरुवात झाली आहे. या तीनही योजनांमध्ये ८५० रुपयांत विविध दिवाळी अंक मिळणार आहेत.

‘मॅजेस्टिक बुक डेपो’च्या संचात दीपावली, मौज, अक्षर, कालनिर्णय सांस्कृतिक, अनुभव, वयंम हे दिवाळी अंक, मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बंद दरवाजा’ ‘बोलंदाजी’, ‘गुणवंतांची यशोगाथा’, ‘स्त्रीत्व आणि आरोग्य’ या चारपैकी एक पुस्तक तसेच ‘मॅजेस्टिक कालनियोजक’ ही डायरी मिळणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी मॅजेस्टिक (०२२-२३८८२२४४-गिरगाव/०२२-२५३७६८६५-ठाणे) येथे संपर्क साधावा, असे आवाहन अशोक कोठावळे यांनी केले आहे.

मॅजेस्टिक बुक हाऊसच्या संचात ‘लोकसत्ता’सह अक्षर, ऋतुरंग, श्री दीपलक्ष्मी या अंकांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संचाबरोबर आर. के. नारायण यांची ‘गाईड’ ही कादंबरी आणि पद्मबंध (प्रा. प्रवीण दवणे) हे पुस्तक भेट दिले जाणार आहे. या संचांची नोंदणी मॅजेस्टिक बुक हाऊस, दादर (०२२-२४३०५९१४), विलेपार्ले (०२२-२६१३२८७९) येथे करता येणार असल्याचे अनिल कोठावळे यांनी सांगितले.

शब्द द बुक गॅलरीच्या भेट योजनेत ‘मौज’, ‘अक्षर’, ‘मुक्त शब्द’, ‘कालनिर्णय सांस्कृतिक’, ‘लोकमुद्रा’, ‘ऋतुरंग’ व अन्य दोन अंक मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२८३३२६४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन येशू पाटील यांनी केले आहे.