पर्यावरणातील जंगल आणि पाणी या महत्त्वपूर्ण घटकांवर व निसर्गातील असंतुलनामुळे मानवी जीवनावर होत असलेल्या परिणामांबाबत पहिल्या दिवशी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची चर्चा शहरी व वैश्विक पर्यावरणावर होत आहे. पाण्यामधील नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राइजने गौरविले गेलेले जलदूत राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत शहरांना भेडसावणारे प्रश्न व त्याचवेळी पर्यावरणाशी निगडीत असलेला अर्थकारणाचा मुद्दा चर्चिला जाईल. कंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचीही या परिषदेला उपस्थिती राहील.
हजारो गावे दुष्काळमुक्त करण्याचे भगीरथी कार्य करणारे जलदूत राजेंद्र सिंह यांनी लोकसहभागातून उभी केलेली पर्यावरणाची गाथा त्यांच्याच शब्दांमधून ऐकण्याची संधी या परिषदेतून मिळणार आहे. पर्यावरणाचे कार्य करताना टोकाची भूमिका घेण्याऐवजी राजेंद्र सिंह यांनी पारंपरिक साधनांचा नव्या पद्धतीने उपयोग केला. त्यांचे अनुभव व पर्यावरणाची भूमिका ही पर्यावरणात झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरेल. औद्योगिकीकरण, त्यामुळे होणारे प्रदूषण, उपजिविकेच्या साधनांपायी वाढलेली लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या या सगळ्याचा आढावा शहर आणि पर्यावरण या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातून घेतला जाणार आहे. स्वच्छता अभियानातून कचरा हा राष्ट्रीय प्रश्न असल्याचे अधोरेखित झालेले असतानाच या कचऱ्याच्या नाना तऱ्हा आणि त्यावरील उपाय यांचा उहापोह दुसऱ्या सत्रात होईल. अर्थकारण व पर्यावरण ही दोन्ही टोके आहेत की नाण्याच्या दोन बाजू यावर चर्चा रंगणार आहे तिसऱ्या सत्रात. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचीही अर्थकारण व पर्यावरणाबाबतची भूमिका यावेळी स्पष्ट होईल.

आपण आणि पर्यावरण 

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

आजची चर्चासत्रे 

पहिले सत्र – शहर आणि पर्यावरण

सहभाग – महेश झगडे, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

सुजीत पटवर्धन, पर्यावरण कार्यकर्ते

विद्याधर वालावलकर, पर्यावरण दक्षता मंच

डॉ. अभय देशपांडे, प्रकाश प्रदूषणाचे अभ्यासक

दुसरे सत्र – कचरा  समस्या तशी महत्त्वाची
सहभाग – डॉ. शरद काळे, बी.ए.आर.सी. संशोधक, कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प

डॉ. श्याम आसोलेकर, आय.आय.टी. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. अभय देशपांडे, खगोलमंडळ संस्थेचे समन्वयक

तिसरे सत्र – पर्यावरण आणि अर्थकारण
सहभाग – प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री राजेंद्र सिंह, जलदूत अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विवेक भिडे, उद्योजक आणि पर्यावरण अभ्यासक

मुंबईत ‘जंगल मे मंगल’!
जिथे जंगल समुद्राला येऊन मिळते त्या परिसराचे ‘मंगल’ (मॅनग्रूव्ह अर्थात तिवरांची झाडे) होते. कारण, अशा ठिकाणी जैवविविधता चांगल्या पध्दतीने जोपासली जाते. म्हणून मुंबईचे पर्यावरणीय व्यवस्थापन करायचे तर तिवरांची जंगले आणि ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या दोन बाबी या शहराच्या पर्यावरणीय मापदंड ठरल्या पाहिजे. या उद्यानात जी झाडे लावली जातात तीच बाहेर लावली तर येथील पशूपक्ष्यांना खाद्य उपलब्ध होऊन येथील जैवविविधतेला बाहेरही ‘राजमार्ग’ (कॉरिडॉर या अर्थाने) उपलब्ध होईल. – विवेक कुळकर्णी