मनसेतून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना अधिकृत गटात समावेश करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून पक्षांतर केलेल्या सहाही नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, या सहा नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी मनसेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर अद्याप निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निर्णय येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांमध्ये अर्चना भालेराव (वॉर्ड क्र. १२६), परमेश्वर कदम (वॉर्ड क्र. १३३), अश्विनी मतेकर (वॉर्ड क्र. १५६), दिलीप लांडे (वॉर्ड क्र. १६३), हर्षल मोरे (वॉर्ड क्र. १८९), दत्ताराम नरवणकर (वॉर्ड क्र. १९७) यांचा समावेश आहे.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबलामध्ये एकूण २२७ जागांपैकी, शिवसेना + अपक्ष (८४+४) = ८८, भाजप + अपक्ष (८३+२) = ८५, काँग्रेस = ३०, राष्ट्रवादी काँग्रेस = ९, मनसे = ७ (यातील ६ नगरसेवक आता सेनेत दाखल होतील) सपा = ६, एमआयएम = २. जागांवर संबंधीत पक्षांचे नगरसेवक निवडून आले आहेत.