मुंबई: रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांचे मोबाइल चोरून पळ काढणाऱ्या एका सराईत आरोपीला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी काही मोबाइल हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चेंबूर कॅम्प परिसरात राहणारा शिवम तिलारे (२०) हा तरुण सोमवारी रात्री बाजारात जात होता. याच वेळी चोराने त्याच्या हातातील ७० हजार रुपये किमतीचा आयफोन हिसकावून पोबारा केला. याबाबत त्याने आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

kalyan police marathi news, kolsewadi police marathi news
कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
Nashik, Fraud with grape producers,
नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
nashik crime news , nashik crime branch police marathi news
नाशिक: सुरगाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

हेही वाचा… मुंबई : रस्त्यांवरील खड्यात मासे, खेळण्यांतील होड्या सोडून मनसेचे अनोखे आंदोलन

आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांनी तत्काळ परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी केली. यावेळी आरोपी कुर्ला परिसरात गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपी तुषार नट (२०) याला कुर्ला परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीअंती तुषारला अटक करण्यात आली.