मुंबई : लालबाग येथील प्रभाग क्रमांक २०४ मधील साईबाबा म्युनिसिपल स्कूल या शाळेची इमारत धोकादायक ठरल्यामुळे गेल्या दीड दोन वर्षांपासून बंद होती. मात्र या शाळेच्या पुनर्बांधणीला अद्यापही सुरूवात झालेली नाही. पालिकेकडे सुशोभिकरणाच्या कामासाठी पैसा आणि वेळ आहे मात्र शाळेच्या पुनर्बांधणीसाठी पैसे नाहीत का असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.

लालबागमध्ये बेस्ट वसाहतीजवळ असलेल्या पालिका शाळेत सकाळी लागलेल्या आग दुर्घटनेत जिवित हानी झालेली नसली तरी या दुर्घनटनेमुळे शाळेच्या पुनर्बांधणीचा विषय चर्चेत आला आहे. शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती बंद करण्यात आली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. करोना काळात या शाळेत करोना केंद्र सुरू केल्यामुळे त्याचे सामान एका खोलीत होते. मराठी मध्यमवर्गीय वस्तीतील शाळा एक दीड वर्षापासून बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केला आहे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी आधी पालिका प्रशासनाने नऊ कोटींचे काम दिले होते. दुरुस्तीही सुरू केली होती. मग नंतर अचानक शाळेची इमारत धोकादायक ठरवली असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता तरी या शाळेची पुनर्बांधणी तातडीने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Metro security guards caught the bicycle thief in Nagpur
नागपूर: मेट्रो सुरक्षारक्षकांनी सराईत सायकल चोराला पकडले
loksatta analysis bmc railway police dispute cause ghatkopar hoarding collapse tragedy
घाटकोपर दुर्घटना बीएमसी, रेल्वे पोलिसातील वादामुळे? होर्डिंगबाबत मुंबई महापालिका १६ वर्षे जुने धोरण का वापरते?
Krishna Khopde opinion on pre monsoon work Nagpur news
आ. कृष्णा खोपडे म्हणतात,’ पुन्हा ‘ती’ परिस्थिती निर्माण झाल्यास जनता रस्त्यावर…’
baobab tree, angry environmentalists,
३०० वर्ष जुन्या बाओबाब झाडाची कत्तल, संतप्त पर्यावरणप्रेमी उद्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार
nalasopara, Massive Fire at Dwarka Hotel, Fire at Dwarka Hotel nalasopara, fire in nalasopara, fire in nalasopara hotel, marathi news, fire brigade fire news,
नालासोपाऱ्यात गॅस गळतीमुळे भीषण आग, तीन जण जखमी; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू
Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई

हेही वाचा – विशेष मुलांसाठी नायर रुग्णालयात उपलब्ध होणार टेलिमेडिसिन सुविधा; ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांना होणार लाभ

प्रशासन सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, रोषणाई यासाठी करोडो रुपये खर्च करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी वापरत आहे. परंतु देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत हे या मुंबईचे दुर्दैव आहे, असा आरोप कोकीळ यांनी केला आहे.

हेही वाचा – मुंबई : नागपाडा पोलीस रुग्णालयात पोलिसाची आत्महत्या

शाळेची दुरुस्ती कधीही सुरु केली नव्हती, मात्र पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.