राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली. आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली. २ डिसेंबर रोजी ही धमकी आल्याचे सूत्रांनी सांगितले.

फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : “…तेव्हा आम्ही शरद पवारांच्या शिव्या खाल्ल्या होत्या”, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं?

पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता. पोलीस हवलदार कृष्णा देऊळकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात २९४, ५०६ (२) भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.