‘पुढचं पाऊल’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री जुई गडकरी हिला एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जुईच्या वाढदिवसादिवशीचं तिला हे निनावी पत्र मिळाले.
सध्या जुई ठाण्यात राहत असून, तिच्या कर्जत येथील घरी ती वाढदिवस साजरा करत होती. त्यावेळी एका लहान मुलाने जुईच्या शेजा-यांना निनावी पत्र नेऊन दिले. या पत्राद्वारे २० जूलैला जुईला संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, जर याबाबत पोलिसांना कळविले तर तुझ्यासोबत घरच्यांनादेखील मारुन टाकेन असा उल्लेख आहे.
या प्रकरणी जुईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.