नियमाला माणुसकीचा स्पर्श दिल्याने मुलीचे प्राण वाचले
अवयवदानाची प्रक्रिया व नियम अत्यंत गुंतागुंतीचे. नियमाला बगल दिल्यास थेट तुरुंगवासच. परंतु नियमाला माणुसकीच्या अर्थाच्या चौकटीत बसवत थेट मामाला आपल्या भाचीसाठी किडनीदान करण्यास प्रथमच परवानगी देण्यात आली. या एका परवानगीमुळे तिघा रुग्णांना किडनी मिळून त्यांना आता सामान्य जीवन जगण्याचा आनंद मिळू शकणार आहे.
मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याअंतर्गत थेट रक्ताच्या नातेवाईकांनाच अथवा न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने जवळच्या व्यक्तीला अवयवदान करता येते. यामध्ये पती-पत्नी, आई-वडील, मुलगा, सख्खा भाऊ एवढय़ांनाच एकमेकांसाठी अवयवदान करता येते. यात काही गुंता होता. म्हणजे एखाद्याने आपल्या पत्नीसाठी किडनी देण्याचा निर्णय घेतला व ती किडनी अथवा अवयव पत्नीला जुळत नसेल तर अन्य रुग्णाच्या नातेवाईला देण्याबाबत व त्या बदली त्या रुग्णाच्या रक्ताच्या नातेवाईकाकडून जुळणारा अवयव घेण्यास (अदलाबदली- ज्याला ‘स्व्ॉप’ म्हणतात) २००९ मध्ये कायद्याने परवानगी देण्यात आली. यामुळे मोठय़ा प्रमाणात अवयव प्रत्यारोपण होणे शक्य होऊन रुग्णांना सामान्य जीवन जगणे शक्य होऊ लागले.
काही वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणात आवयवांची तस्करी वा विक्री होऊ लागल्यामुळे केंद्र शासनाने आवयव प्रत्यारोपण कायद्यात कडक तरतुदी केल्या होत्या. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे प्रचंड हाल होऊ लागले. परवानगीसाठी शासनाच्या वैद्यकीय समित्यांकडे हेलपाटे घालावे लागू लागले. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अलीकडेच विधिमंडळात या कायद्यात रुग्णहिताला प्राधान्य देऊन आवश्यक ते बदल करण्याचे जाहीरही केले होते. याच घोषणेचा दाखला देत काही नातेवाईकांनी शासनाकडे ‘भाचीला किडनी देण्यास मामाला परवानगी द्या’, असे साकडे घातले. या एका परवानगीमुळे तिघा रुग्णांना ‘स्व्ॉप’ द्वारे अवयव मिळण्याचा (किडनी) मार्ग मोकळा होणार होता.
ज्योती व बाळू हे पती-पत्नी असून पत्नीला किडनी देण्यास बाळू तयार होता. आरती व मकरंद हेही पती-पत्नी असून पतीला किडनी देण्यास आरती तयार आहे. परंतु या दोघांचीही किडनी एकमेकांना जुळत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये स्व्ॉप होण्यास अडचण होती. त्याचवेळी हिंदुजा रुग्णालयात हरिप्रसाद यांना त्यांच्या मामाने किडनी देण्याची तयारी दाखवली. मात्र ‘ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्य़ुमन ऑर्गन अ‍ॅण्ड टिश्यू कल्चर अ‍ॅक्ट २०१४’नुसार मामाला आपल्या भाचीला किडनी देता येत नव्हती. शासनाने जर त्यांना परवागनी दिली तर हरिप्रसादच्या मामाची किडनी मकरंदला, ज्योतीची किडनी हरिप्रसादला व आरतीची किडनी बाळूला मॅच होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर शासनाच्या संबंधित समितीकडे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांनीही याबाबत कायद्यात तरतूद नसली तरी हे एक स्वतंत्र प्रकरण असल्याचे नमूद केले. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे हे आगळे प्रकरण मान्यतेसाठी आले. तेव्हा या संपूर्ण प्रक रणात कोठेही आर्थिक हितसंबंध नसल्यामुळे व मामाला भाचीसाठी परवानगी दिल्यास त्याचा फायदा तिघा रुग्णांना होणार असल्यामुळे त्यांनी नियमांचा योग्य अर्थ लावून त्याला मान्यता दिली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मान्यता देऊन आज शनिवारी या तिघा दात्यांना ‘स्व्ॉप’ अवयवदानासाठी मान्यता देण्यात आली.
ज्योती व बाळू हे पती-पत्नी असून पत्नीला किडनी देण्यास बाळू तयार होता. आरती व मकरंद हेही पती-पत्नी असून पतीला किडनी देण्यास आरती तयार आहे. परंतु या दोघांचीही किडनी एकमेकांना जुळत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये स्व्ॉप होण्यास अडचण होती. त्याचवेळी हिंदुजा रुग्णालयात हरिप्रसाद यांना त्यांच्या मामाने किडनी देण्याची तयारी दाखवली. मात्र ‘ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्य़ुमन ऑर्गन अ‍ॅण्ड टिश्यू कल्चर अ‍ॅक्ट २०१४’नुसार मामाला आपल्या भाचीला किडनी देता येत नव्हती. शासनाने जर त्यांना परवागनी दिली तर हरिप्रसादच्या मामाची किडनी मकरंदला, ज्योतीची किडनी हरिप्रसादला व आरतीची किडनी बाळूला मॅच होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर शासनाच्या संबंधित समितीकडे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांनीही याबाबत कायद्यात तरतूद नसली तरी हे एक स्वतंत्र प्रकरण असल्याचे नमूद केले. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे हे आगळे प्रकरण मान्यतेसाठी आले. तेव्हा या संपूर्ण प्रक रणात कोठेही आर्थिक हितसंबंध नसल्यामुळे व मामाला भाचीसाठी परवानगी दिल्यास त्याचा फायदा तिघा रुग्णांना होणार असल्यामुळे त्यांनी नियमांचा योग्य अर्थ लावून त्याला मान्यता दिली.

मामाने भाचीला किडनी देणे हे कायद्याच्या चौकटीत तंतोतंत बसणारे नसले तरी त्याचा कायद्याचा आधार घेत माणुसकीचे नाते जपणारा अर्थ लावून तीन रुग्णांना होणारा त्याचा फायदा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. याबाबात लवकरच कायद्यातील नातेवाईकांच्या व्याख्येत सुधारणा करून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला जाईल.
– विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री