:वेतनकरार व अन्य मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बुधवारपासून पुकारलेला संप २० ऑगस्टपर्यंत तूर्तास स्थगित केला आहे. २० ऑगस्टपर्यंत बेस्ट उपक्रमासोबत होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा काढला जाणार आहे. जर तोडगा निघाला नाही, तर कामगारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची मंगळवारी दुपारी २ वाजता बेस्ट उपक्रमाने वेतनकरारावर चर्चा करण्यासाठी नेमलेल्या समितीसोबत चर्चा झाली. त्यानंतर  मेळावा पार पडला. वेतनकरारावर सकारात्मक चर्चा होत असल्याने मेळाव्यात संप २० ऑगस्टपर्यंत तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कृती समितीचे नेते शशांक राव यांनी वेतनकरार व अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले.