मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वीकएन्ड असल्यामुळे या मार्गावर नेहमीपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
शनिवार आणि रविवार सुटी असल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी व पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे टोल नाक्यांवर गर्दी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लांबल्या आहेत. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी प्रवास करणाऱ्यांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई गोवा मार्गावरही कोंडी
त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी घाटात टँकर बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. रस्त्याचं सुरू असलेले काम यामुळे आधीच अरूंद झालेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दोन दिवस सुट्या असल्यामुळे गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. परंतु वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या आनंदावर पाणी फेरल्याचे दिसत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on mumbai pune express way
First published on: 24-12-2016 at 11:23 IST