मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील जुन्या जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील (जेव्हीएलआर) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा फटका सलग तिसऱ्या दिवशीही वाहनचालक, प्रवाशांना बसला. दुरुस्तीसाठी हा उड्डाणपूल पूर्णत: बंद असल्याने उड्डाणपुलाच्या खालून वाहतूक सुरू होती. परिणामी, विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे. विक्रोळी ते घाटकोपरदम्यान शनिवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारीही अशीच परिस्थिती होती आणि सोमवारीही वाहनचालक, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएमआरडीसी) दोन किमीच्या उड्डाणपुलाचे २०० बेअिरग बदलण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. १३ मेपासून बदलण्यात आलेल्या १४८ दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून यासाठी वाहतूक पोलिसांच्या परवानगीनुसार १३ ते २४ मेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam third day row jvlr flyover repair blow ysh
First published on: 17-05-2022 at 00:02 IST