सरकारचा न्यायालयात दावा
मुंबई : आदिवासींचे राहणीमान, त्यांची परंपरा, लहान वयात होणारे विवाह, लहान वयातील मातृत्व, डॉक्टरकडे न जाता तांत्रिकाकडे जाणे ही कारणे मेळघाटसह राज्यातील आदिवासी भागांतील बालमृत्यूसाठी कारणीभूत असल्याचा दावा राज्य सरकारने न्यायालयात केला. आजारी आदिवासींना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावे याकरिता तांत्रिकांनाच हाताशी धरून त्यांना रुग्णालयात आणण्याची नवी क्लृप्ती लढवण्यात येत असल्याचेही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायालयाने मात्र कुपोषणामुळे आणि वैद्यकीय मदत मिळत नसल्याने बालमृत्यू आणि गर्भवतींचे मृत्यू होत असल्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधत वैद्यकीय सुविधा वा कुपोषणामुळे यापुढे एकही बालमृत्यू होणार नाही हे केंद्रस्थानी ठेवण्याचे आदेश सरकारला दिले. वैद्यकीय उपचारादरम्यान एखाद्याला वाचवता आले नाही, तर समजण्यासारखे आहे. परंतु वैद्यकीय मदत न मिळाल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शासनाला सोमवारी खडसावले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal lifestyle tradition causes child mortality government claims in court akp
First published on: 21-09-2021 at 00:03 IST