संतोषीमाता रोडवर गुरुवारी संध्याकाळी एका ट्रकने दिलेल्या धडकेत एक रिक्षाचालक जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. किशोर अवसकर असे मयत चालकाचे नाव आहे. सुरेशकुमार यादव हा चालक जखमी आहे. ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला नागरिकांनी बेदम चोप दिला. सहजानंद चौक येथे अवसकर उभा असताना समोरून आलेल्या ट्रकने त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात अवसकर जागीच ठार झाला. तर बाजूने येत असलेल्या रिक्षालाही ट्रकने धडक दिल्याने यादव जखमी झाला.