नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या.

नालासोपा-याच्या भंडार आळीत राहणा-या आकांक्षा आणि अक्षता ठाकूर या जुळ्या बहिणी वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात विज्ञान शाखे शिकतात. गुरूवारी आलेल्या बारावीच्या निकालात आकांक्षाला ९२.९२ टक्के तर अक्षताला ९०.७६ टक्के गुण मिळाले. आकांक्षाला तर गणिता शंभरापैकी शंभर गुण मिळाले आहेत.

इयत्ता दहावीला देखील त्यांनी असेच यश मिळवले होते. दहावीला होलीक्रॉस शाळेतून अक्षता आणि आकांक्षा अनुक्रमे ९४.८० आणि ९४.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या. सलग दुस-या महत्वाच्या परीक्षेत दोन्ही जुळ्या बहिणींनी नव्वदीपार बाजी मारली आहे. आकांक्षाला वास्तुविशारद व्हायचं आहे तर अक्षताला लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन सनदी अधिकारी बनायचं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twin sisters unique twin success msr
First published on: 17-07-2020 at 11:43 IST