अनाथ अल्पवयीन मुलीच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यात दोन चुलत भावांकडून तिच्यावर गेल्या दहा महिन्यांपासून बलात्कार होत होता. या मुलीने कशीबशी खिडकीतून मदतीसाठी चिठ्ठी खाली फेकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
 पीडित मुलगी १७ वर्षांची असून तिच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तिच्या काकीने तिला मीरा रोड येथे राहण्यास आणले. तेथे तिच्या दोन मुलांसह ही मुलगी राहू लागली. परंतु तेथेच तिची शोकांतिका सुरू झाली. तिला घरात कोंडून मारहाण करण्यात येत होती. पण फेब्रुवारीपासून तिचे दोन्ही भाऊ तिच्यावर बलात्कार करत होते. हा प्रकार तिने आपल्या काकींना सांगितला, पण तिने याकडे दुर्लक्ष केले. गेले दहा महिने ती हा अत्याचार सहन करत होती. बुधवारी तिने कशीबशी घराची खिडकी उघडली. पण तिला बोलता येत नव्हते. मदतीसाठी या मुलीने चिठ्ठी लिहून कागद खाली फेकला. तेथून जाणारे मनसे विभाग अध्यक्ष मनोज कोतवाल यांना ती चिठ्ठी मिळाली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काशिमिरा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या फ्लॅटचे कुलूप तोडून या मुलीची सुटका केली. तिच्या अंगावर मारहाणीच्या असंख्य खुणा आढळल्या. या प्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये अटक केल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two brothers held for raping minor cousin in mira road
First published on: 04-12-2014 at 03:00 IST