सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन परदेशी नागरिकांना वेगवेगळ्या घटनांमध्ये गुरुवारी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३४ लाख १३ हजार रुपयांचे १.२९ किलो सोने जप्त करण्यात आले.सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लंडनहून येथे आलेल्या राजनयागन याच्याकडे २७ लाथ १२ हजार रुपये किमतीचे सुमारे सव्वाकिलो सोन्याचे दागिने सापडले. ‘ग्रीन चॅनेल’ या मार्गीकेतून बाहेर पडताना राजनयागन याला अटक करण्यात आली.
अन्य एका घटनेत कोलंबो येथून आलेल्या मोहंमद रावसन हमसाथुल याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याची बिस्कीटे व ११५ ग्रंॅमच्या दोन सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या. भ्रमणध्वनीमध्ये बॅटरीच्या जागी सोन्याची बिस्कीटे ठेवली होती.