मुंबईच्या चेंबूर परिसरातील घरात दोन ज्येष्ठ महिलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. येथील सिंधी कॉलनीमधील त्रिशूल सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. मृत पावलेल्या मोहिनी जेठवाणी आणि बसंती जेठवाणी या सोसायटीत वास्तव्याला होत्या. मात्र, आज अचानकपणे खोलीत त्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र, अनेकदा प्रयत्न करूनही या दोघींनी दरवाजा न उघडल्यामुळे पोलिसांनी अग्निशामन दलाच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांना दोघींचे मृतदेह आढळून आले. या दोघींच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. सध्या त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. येथील स्थानिक रहिवाश्यांच्या माहितीनुसार, त्यांनी या दोघींना मंगळवारी शेवटचे पाहिले होते. त्यावेळी या दोघीही पेपर आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2016 रोजी प्रकाशित
चेंबुरमध्ये दोन ज्येष्ठ महिलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ
आज दुपारी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-06-2016 at 16:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two old age women dead bodies found in mumbai