चर्चगेट लोकल मधून तोल जाऊन फलाट पडल्यामुळे शनिवारी संध्याकाळी दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. कांदिवली रेल्वे स्थानकात संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात घडला.
गुजरातच्या जुनागढ येथे राहणाऱ्या शहिदा सैय्यद (३०) आणि शाहनवाज शेख (३२) या पतीसह लातूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. दोघींचे पती पुरुषांच्या डब्यात चढले, तर त्या महिलांच्या डब्यात चढल्या. त्यांनी भाईंदर येथून चर्चगेट लोकल पकडली होती. ट्रेन कांदिवलीहून जात असताना सव्वा सातच्या सुमारास शहिदा तोल जाऊन खाली पडली. तिला वाचविण्यासाठी तिची भावजय शाहनवाज शेख गेली आणि तीसुद्धा खाली पडली. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.