मुंबईत ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने हिंदुत्व, हनुमान चालिसा अशा विविध मुद्द्यांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. भाजपावर ( BJP ) सडकून टीका करतांना लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले “ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने ( Shivsena ) हिंदुत्व सोडलं आहे..हिंदुत्व म्हणजे थोतर आहे का ? बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. तुमचे हिंदुत्व आहे कुठे, आम्हाला हिंदुत्व शिकवत आहांत ? तुम्ही काय केलंत हिंदुत्वसाठी, राम मंदिर ( Ram Mandir ) बांधण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला नाही, राम मंदिरचा आदेश हा कोर्टाने दिला आहे, यांनी तर मंदिर उभारण्यासाठी झोळी पसरली होती”, अशी टीका भाजपाचे नाव न घेता केली.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

“हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी ? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये,आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, आमच्या घरी यायचे आहे तर या…पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिदुंत्वाच्या व्याख्येत सांगितल आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

इथे तर सगळ्यांनी मास्क काढले आहेत. जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोर्पयन्त तुम्ही काढू नका, मागे बोललो होतो तरी पुन्हा बोलतो, मास्क सक्ती नसली तरी मास्क मुक्ती अजून झालेली नाही. लवकरात लवकर माझा इरादा आहे जाहिर सभा घ्यायचा. मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा एकादा परामार्श सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे, हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे असेही उद्ध ठाकरे म्हणाले.

दरम्यान बेस्टमध्ये ई बससाठी पुढील ४ वर्षात एक हजार कोटी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. माफक दरात दर्जेदार बेस्टची सेवा देत आहोत. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर आता खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना बेस्ट बस विशेष सुविधा देत आहे. मुंबई पालिकेतील शाळेचा दर्जा हा इतर कोणत्या राजधानी असलेल्या शहरात आहे का ? करायचं काही नाही, बिनकामाचे भोंगे जे वाजवत आहेत त्यांना काडीची किंमत देत नाही, आम्ही जे करतो ते बेस्टच करतो. हे सांगण्याचा हा कार्यक्रम आहे असेही चिमटे उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता काढले.