मुंबईत एक ऑक्टोबरपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा निर्णय झाला असताना महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांच्या ‘एलबीटी’ विरोधाला पाठींबा दिला आहे. त्याऐवजी जकात सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मागणी उद्धव यांनी म्हटले आहे.
व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध आहे. ते कर देण्यास तयार आहेत. पण एलबीटी नको. त्यापेक्षा जकात कर सुरू ठेवावा असे व्यापाऱ्यांनी आपल्याला सांगितले. जकातीमुळे मुंबई महानगरपालिकेला सात ते आठ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.
पण ‘एलबीटी’तून इतका महसूल मिळणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना नागरी सुविधा देण्यासाठी महसूल कमी पडेल, असे उद्धव यांनी एलबीटीला विरोध करताना नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2013 रोजी प्रकाशित
उद्धव ठाकरे यांचा एलबीटीला विरोध
मुंबईत एक ऑक्टोबरपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा निर्णय झाला असताना महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांच्या ‘एलबीटी’ विरोधाला पाठींबा दिला आहे. त्याऐवजी जकात सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मागणी उद्धव यांनी म्हटले आहे.
First published on: 05-05-2013 at 02:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray not in fever of lbt