जर तुमच्यात जर हिंमत असेल तर चोरलेलं शिवसेना हे नाव आणि चोरलेलं धनु्ष्यबाण हे घेऊन निवडणुकीच्या मैदानात या. मी मशाल घेऊन निवडणुकीच्या मैदानात येतो. मग होऊन जाऊदेत दोन हात बघुयात कोण जिंकतं असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. तसंच निवडणूक आयोगावर आमचा मुळीच विश्वास नाही. निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हणतात त्याऐवजी त्यांना चुना लावणारा आयोग म्हटलं पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईत मराठी भाषा दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातल्या छोटेखानी भाषणात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपाचा समाचार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?

पूर्वी पत्रकारांच्या हाती कलम असायचं आता कमळ असतं. सगळ्यावरच आपलं वर्चस्व या यांना प्रस्थापित करायचं आहे.ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी तीळमात्र संबंध नव्हता तेच लोक आज पुन्हा स्वातंत्र्य मारायला निघाले आहेत. ७५ वर्षांनंतर लोकशाहीला आदरांजली वाहण्याची वेळ या लोकांनी आणली आहे. शिवसेना आपल्यातून कुणीही चोरू शकत नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray open challenge to cm eknath shinde about election commission decision scj
First published on: 27-02-2023 at 21:43 IST