लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव रुग्णालयांमधील एमआरआय यंत्रणेची कायमर्यादा संपुष्टात आल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. एमआरआय यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असल्याने रुग्णांचे हात आहेत. एमआरआय काढण्यासाठी रुग्णांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र केंद्र सरकारच्या एम्स रुग्णालयांमध्ये वापरण्यात येत असलेली अद्ययावत एमआरआय यंत्रणा मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. ही यंत्रे येत्या महिनाभरामध्ये केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेनुसार सप्टेंबरच्या अखेरीस सर्व रुग्णालयांमध्ये एमआरआय यंत्रे येणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकारच्या एम्स रुग्णालयासाठी एक एमआरआय यंत्र २६ कोटी रुपयांमध्ये उपलब्ध होत असताना महानगरपालिकेला त्यासाठी ३६ कोटी रुपये मोजावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया रद्द करून एम्समार्फत एमआरआय यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारकडून रितसर परवानगी घेऊन ही यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला काही कालावधी लागल्याने रुग्णालयात एमआरआय यंत्र उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील महिनाभरामध्ये चार नवी अद्ययावत एमआरआय यंत्रे उपलब्ध होणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा-धारावी पुनर्विकासात सर्व झोपडीवासीयांचे पुनर्वसन ! पात्र वगळता इतरांना धारावीबाहेर घरे ?

मागील अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमआरआय व सीटी स्कॅन यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एमआरआय व सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्णांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये एमआरआय व सीटीस्कॅन करावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सात महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयासाठी अद्ययावत सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार या रुग्णालयांमध्ये नुकतीच अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रे उपलब्ध करण्यात आली होती. आता महिन्याभरात अद्ययावत एमआरआय यंत्रेही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Updated mri system in kem sion nair and cooper within a month mumbai print news mrj
First published on: 27-01-2024 at 20:56 IST