scorecardresearch

“महिला एकटी असताना चालकाने गाडीत…”, मुंबईत अमेरिकी महिलेचा कॅबमध्ये लैंगिक छळ, आरोपीला बेड्या

४० वर्षीय व्यावसायिक महिला एका कामानिमित्त गेल्या महिन्याभरापासून मुंबईत राहत आहे. शनिवारी मुंबईत परतताना या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे

“महिला एकटी असताना चालकाने गाडीत…”, मुंबईत अमेरिकी महिलेचा कॅबमध्ये लैंगिक छळ, आरोपीला बेड्या
(प्रातिनिधिक छायाचित्र)

अमेरिकी नागरिक असलेल्या एका महिलेचा मुंबईत एका कॅब चालकानं लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी चालक योगेंद्र उपाध्यायला डीएन नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या ३५४ (A) आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४० वर्षीय व्यावसायिक महिला एका कामानिमित्त गेल्या महिन्याभरापासून मुंबईत राहत आहे. शनिवारी दुसऱ्या शहरातून मुंबईत परतताना या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेने सहकाऱ्यांसह एक कॅब बुक केली होती. मुंबईत परतत असताना एकामागोमाग एक सहकारी या कॅबमधून उतरल्यानंतर ही महिला एकटीच कॅबमधून प्रवास करत होती.

मुंबईः अश्‍लील चित्रफीतीद्वारे लाखों रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

“या महिलेला अंधेरी पश्चिमला उतरायचे होते. महिला एकटी असल्याचा फायदा घेत चालकाने गाडीत हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून महिलेनं चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि ती जेपी रोडला उतरली. त्यानंतर या महिलेने नागरिकांकडे मदत मागितली. त्यातील एकाने घटनेची माहिती डीएन नगर पोलिसांना दिली. दरम्यान, जमावाने या चालकाला पकडून ठेवले होते. पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्याला ताब्यात देण्यात आले”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. हा ४० वर्षीय आरोपी गोरेगावचा रहिवासी असून त्याच्यावर याआधी कुठलाही गुन्हेगारी खटला दाखल नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 09:45 IST

संबंधित बातम्या