ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या आणि धडाडीच्या पत्रकारांमध्ये मुख्य क्रमाने त्यांचं नाव घेतलं जातं. दिनू रणदिवे यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. १९५६ मध्ये त्यांनी पत्रकारिता करण्यास सुरुवात केली. दलित, उपेक्षित, वंचित यांचे प्रश्न त्यांनी कायमच मांडले. त्यांच्या समस्यांसाठी ते कायमच झगडत होते. आज अखेर वृ्द्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली ती इथूनच. त्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते. १९८५ मध्ये ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. १९७२ मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्ती लढ्याचंही वार्तांकन गाजलं होतं . मुंबई प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Very senior journalist dinu randive passed away in mumbai scj
First published on: 16-06-2020 at 12:13 IST