लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्य संस्थेतून बालकलाकारच्या भूमिकेतून रंगभूमीवर पाऊल टाकणारे ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे सोमवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. राजा बापट यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘सागर माझा प्राण’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘यशोदा’, ‘श्रीमंत’ या नाटकांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा >>> आदिवासी माता-बाल आरोग्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याची शिफारस!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याव्यतिरिक्त ‘दामिनी’, ‘समांतर’, ‘झुंज’, ‘वादळवाट’, ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनयाची छाप सोडली होती. ‘बाळा गाऊं कशी अंगाई’, ‘एकटी’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘थोरली जाऊ’, ‘व्हेंटिलेटर’ आदी मराठी, तर ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. मराठी आणि इंग्रजी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी मालिका आणि नाटकांमध्येही कामे केली होती. ‘ढाई आखड प्रेम के’, ‘चुप कोर्ट चालू है’ ही हिंदी नाटके तर ‘वख्त की रफ्तार’, ‘दुश्मन’, ‘खोज’ या हिंदी मालिकांमध्येही छोटेखानी भूमिका केल्या होत्या.