बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे आज निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
साधना या ६०-७०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी जवळपास ३५ हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. यात ‘वो कौन थी’, ‘मेरा साया’, ‘गीता मेरा नाम’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘दुल्हा दुल्हन’, ‘हम दोनो’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’, ‘आजा आई बहार दिल है बेकरार’, ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’ यांसारखी हिट गाणी त्यांच्यावर चित्रीत करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress sadhana passes away in mumbai
First published on: 25-12-2015 at 12:45 IST