अंधश्रद्धेतून वृद्धाची हत्या करणाऱ्या सहा तरुणांना पोलिसांनी अटक केली. यात हत्येची सुपारी देणाऱ्या दोघा भावांचा समावेश असून त्यांनी आणखी तिघांच्या हत्येचा कट आखला होता. पोलिसांनी वेळीच आरोपींना अटक केल्याने त्यांचा जीव वाचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक मोरे (३९), विनोद मोरे (३०) अशी त्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. परिसरातील चार व्यक्तींनी त्यांच्यावर करणी केली, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असा दोघांचा समज होता. त्या चौघांची हत्या करण्याचा कट या दोघांनी आखला. त्यासाठी घाटकोपर, गोवंडीतील आसिफ नासिर शेख (वय २८), मैनुद्दीन अन्सारी (वय २६), आरिफ अब्दुल सत्तार खान (वय ३०) आणि  शहानवाज उर्फ सोनू अख्तर शेख (वय ३०) या चौघांना सुपारी दिली.

आरोपींनी १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुलुंड पश्चिमेकडील वालजी लढ्ढा मार्गावर पदपथावर झोपलेल्या मारुती गवळी (७०) यांची हत्या केली.

खबऱ्यांनी दिलेल्या अस्पष्ट दुव्याआधारे पथकांनी चौकशी, तपास केल्यावर ही पथके मोरे बंधूंपर्यंत पोहोचली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victim of old age out of superstition abn
First published on: 15-10-2020 at 00:21 IST