माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि त्याची पत्नीने मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पगार मागितला म्हणून विनोद कांबळी व त्याची पत्नी अँड्रिया या दोघांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप विनोद कांबळीच्या मोलकरणीने केला आहे.
विनोद कांबळीच्या घरी काम करणा-या मोलकरणीचा व कांबळी दाम्पत्यामध्ये पगारावरुन वाद होता. मोलकरणीने कांबळी दाम्पत्याकडे पगारवाढ मागितली होती. यानंतर कांबळी दाम्पत्याने तीन दिवस एका खोलीत डांबून ठेवले व मारहाण केली असा आरोप त्यांच्या मोलकरणीने केला आहे. वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, भारतीय दंडविधान ३४२, ५०४, ५०६ आणि ३४ कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2015 रोजी प्रकाशित
मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी विनोद कांबळीविरोधात तक्रार
माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि त्याची पत्नीने मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

First published on: 30-08-2015 at 12:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod kambli in legal trouble for allegedly beating abusing domestic help