मुंबई : Vivaan Sundaram passed away चित्र-शिल्पांच्या पलीकडल्या दृश्यकलेत मांडणशिल्पे, व्हीडिओकला आदी अनेक प्रयोग करणारे आणि सामाजिक भान जपणारे दृश्यकलावंत विवान सुंदरम यांचे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. विवान हे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून प्रयोगशील कलाकृतींसाठी ओळखले जात. गेली चार वर्षे ते आजारी होते. त्यामुळे करोना, टाळेबंदी यांविषयीचे त्यांचे भाष्य दृश्यकलेतून दिसू शकले नाही. प्रकृती अधिकच खालावल्याने आठवडाभर ते कृत्रिम श्वसनावर होते. बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता दिल्लीच्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  देशभरातील अनेक नव्या चित्रकार आणि रसिकांना विवान यांच्या कलाकृतींचे अप्रूप असे. १९६८ मध्ये, युरोपात तरुणाईची चळवळ सुरू असताना विवान ब्रिटनमध्ये शिकत होते. तेथे त्यांची सामाजिक-राजकीय दृष्टी व्यापक झाली. पुढली काही वर्षे त्यांनी कॅनव्हासवर तैलचित्रे केली, पण भारतात नवे काय करता येईल याचाही शोध सुरू केला. कसौली येथे चित्रकारांना एकत्र राहण्या- काम करण्याची सुविधा उभारण्यापासून त्यांचे कलाक्षेत्रातील संघटनकार्यही सुरू झाले. डाव्या पक्षांकडेही विवान आकृष्ट झाले होते.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

मात्र, अन्य चित्रकारांशी वागताना-बोलताना राजकारणाची नव्हे, तर कलेचीच भाषा ते वापरत. ‘आर्ट् अ‍ॅण्ड आयडियाज’ हे कलाविषयक गंभीर नियतकालिक चालते ठेवण्यात विख्यात कलासमीक्षक व सांस्कृतिक सिद्धान्तकार गीता कपूर यांचे सहचर आणि वैचारिक सहयात्री असलेल्या विवान यांचा वाटा मोठाच होता. १९८९ मध्ये साम्यवादी सत्तांच्या पाडावानंतर विवान यांची कला नव्या जोमाने बहरली. जगातल्या महत्त्वाच्या गॅलऱ्या आणि संग्रहालयांमध्ये कलाप्रदर्शने करून आपल्या कलेतून भांडवली- पर्यावरणदुष्ट- गरीबविरोधी व्यवस्थेच्या विसंगती दाखवून देण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला.

अर्थात, स्वत: कलाकार म्हणून मोठे होताना त्यांनी अनेक होतकरू चित्रकारांच्या परदेशी शिक्षणास मदत करणे, ‘दिल्ली बिएनाले’साठी संघटन करणे, चित्रकारांना सामाजिक मुद्दय़ांवर एकत्र येण्याची प्रेरणा देणे असे कामही त्यांनी केले. ‘गागावाका’ या फॅशन शोसाठी त्यांनी कपडेही अभिकल्पित केले, पण त्यांमधून जीवनपद्धतीची निरंकुशता, मृत्यू, बळावणारे आजार यांविषयी भाष्य होते.